जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे दोन गरजू विद्यार्थिनींना सायकलची मदत

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे दोन गरजू विद्यार्थिनींना सायकलची मदत

वडिलांचे छत्र हरपलेल्या रेखा आणि वैष्णवी यांच्या शिक्षणाला मदतीचा आधार

बेळगाव : प्रतिनिधी

बहादूरवाडी येथील सरकारी मराठी शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन गरजू विद्यार्थिनींना जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे सायकलची मदत देण्यात आली. रेखा भाऊ पाटील आणि वैष्णवी भाऊ पाटील या दोघींच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगामुळे त्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने ग्रुपने पुढाकार घेतला.

वडिलांचे छत्र हरपल्याने या दोन्ही विद्यार्थिनींच्या कुटुंबावर संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत शाळेत जाण्या-येण्यासाठी त्यांना मदत व्हावी आणि त्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, यासाठी सायकल देण्याचा निर्णय घेण्यात आला. या मदतीमुळे विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी मोठा आधार मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत सायकल मोलाची ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमासाठी वरिष्ठ जलतरण प्रशिक्षक श्री. श्यामसुंदर मालाई यांनी प्रायोजक म्हणून विशेष सहकार्य केले. गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, माजी सेक्रेटरी प्रदीप चव्हाण, बीओडी सदस्य आकाश लाटूकर, सदस्य प्रकाश तांजी तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मदत करून त्यांचे शिक्षण सुरू राहावे, यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित झाली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 − three =

error: Content is protected !!