जायंट्स ग्रुपतर्फे ‘उत्कृष्ट गणेशमूर्ती’ व ‘उत्कृष्ट देखावा’ स्पर्धा; नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस

जायंट्स ग्रुपतर्फे ‘उत्कृष्ट गणेशमूर्ती’ व ‘उत्कृष्ट देखावा’ स्पर्धा; नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन या सामाजिक संस्थेतर्फे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ‘उत्कृष्ट गणेशमूर्ती’ आणि ‘उत्कृष्ट देखावा’ या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या दोन्ही स्पर्धा बेळगाव दक्षिण आणि बेळगाव उत्तर अशा दोन विभागांमध्ये स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहेत. दोन्ही विभागांतील उत्कृष्ट मूर्ती आणि देखाव्यांची निवड करून प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच एक उत्तेजनार्थ अशा चार बक्षिसांनी विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी १७ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जायंट्स ग्रुपतर्फे करण्यात आले आहे. नोंदणीसाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने इच्छुक मंडळांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.

नोंदणीसाठी डब्ल्यू. के. आचमणी हार्डवेअर, गणपत गल्ली (मो. 9448147909), नंदिनी डेअरी, केळकर बाग (मो. 9945945547), फॅशन कॉर्नर, टिळकवाडी (मो. 9590480505) आणि मंजुनाथ ज्वेलर्स, खडेबाजार, शहापूर (मो. 9448790612) येथे संपर्क साधता येईल.

गणेशोत्सव मंडळांमध्ये कलात्मकता, सामाजिक संदेश आणि आकर्षक सजावटीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे आणि सचिव विश्वास पवार यांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 4 =

error: Content is protected !!