बेळगाव : शहापूर परिसरात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच बेळगाव सोशल वर्कर रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सकाळी माहिती मिळाल्यानंतर टीमचे सदस्य अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली आणि शुभम हुली यांनी विलंब न करता घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.
यावेळी बेळगाव अग्निशमन दलाच्या सहकार्याने मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि तपासासाठी मृतदेह शाहापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला.
संवेदनशील परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचून प्रशासन व आपत्कालीन यंत्रणांना सहकार्य केल्याबद्दल सोशल वर्कर रेस्क्यू टीमच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
