घुमटमाळ मारुती मंदिरात ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाचा भक्तिमय कार्यक्रम

घुमटमाळ मारुती मंदिरात ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाचा भक्तिमय कार्यक्रम

सुरेल भजनांनी हिंदवाडी परिसरात भक्तिरसाची बरसात; २५ भगिनींचा सहभाग

बेळगाव : सुरेल स्वरांतून भक्तीचा सुंदर दरवळ पसरवत आणि मधुर भजनांनी वातावरण भक्तिमय करणाऱ्या ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ, वडगाव यांच्या सादरीकरणाचे अनंत लाड यांनी विशेष कौतुक केले.

हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिराचा यावर्षी जीर्णोद्धार करण्यात येणार असून, त्यानिमित्त मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून शनिवारी सायंकाळी ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ, वडगाव यांच्या भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात मंडळाच्या मार्गदर्शक शंकर पाटील, अध्यक्षा मंगल अकनोजी आणि तबलावादक सविता सावंत यांच्यासह एकूण २५ भगिनींनी सहभाग घेतला. आपल्या सुमधुर आवाजात विविध भक्तिगीते आणि भजने सादर करून त्यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

यावेळी घुमटमाळ मारुती मंदिराचे अध्यक्ष कुलदीप भेकने, उपाध्यक्ष प्रकाश माहेश्वरी आणि खजिनदार रघुनाथ बांडगी यांच्या हस्ते ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला.

मंदिराचे सेक्रेटरी अनंत लाड यांनी महिला भजनी मंडळाच्या सुरेल सादरीकरणाचे कौतुक करत त्यांच्या भक्तिमय योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 + eight =

error: Content is protected !!