अनगोळच्या आरव अनिकेत भोसलेची कर्नाटक मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड!

अनगोळच्या आरव अनिकेत भोसलेची कर्नाटक मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड!

बेळगाव जिल्हा फुटबॉल संघात स्थान; आरवच्या यशामुळे अनगोळच्या शिरपेचात मानाचा तुरा

बेळगाव : अनगोळ येथील होतकरू फुटबॉलपटू आरव अनिकेत भोसले याची कर्नाटक राज्य मिनी ऑलिम्पिक-२०२६ स्पर्धेसाठी बेळगाव जिल्ह्याच्या फुटबॉल संघात निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे अनगोळसह संपूर्ण बेळगाव परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लहान वयातच फुटबॉल खेळाची आवड निर्माण झालेल्या आरवने मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही त्याच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

आरवच्या या यशामागे सेंट पॉल्स स्कूलमधील शिक्षकवर्ग, त्याचे आई-वडील, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच त्याला फुटबॉल क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे.

विशेष म्हणजे आरव अनिकेत भोसले हा टिळकवाडी येथील प्रसिद्ध सुरभी हॉटेलचे मालक दामोदर भोसले यांचा नातू आहे. आरवच्या निवडीमुळे भोसले कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आगामी मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत आरवने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून बेळगाव जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा आणि भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश संपादन करावे, अशा शुभेच्छा त्याला दिल्या जात आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 1 =

error: Content is protected !!