हिट अँड रन प्रकरणाचा मारीहाळ पोलिसांकडून छडा; टिप्पर चालकाला अटक

हिट अँड रन प्रकरणाचा मारीहाळ पोलिसांकडून छडा; टिप्पर चालकाला अटक

Belgaum, दि. 13 जुलै: मारीहाळ पोलिसांनी हिट अँड रन अपघात प्रकरणाचा यशस्वी छडा लावत अपघात करून फरार झालेल्या टिप्पर चालकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै 2026 रोजी पहाटे 4.00 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान Belgaum-गोकाक मार्गावरील मुच्चंडी गावाजवळ भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या राजू रामा अष्टेकर (वय 46, रा. चंदगड) यांना जोरदार धडक दिली होती. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला होता.

या घटनेप्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/2026 नोंद करून तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता KA-22/B-1610 क्रमांकाचा हिरव्या इंजिन व लाल बॉडी असलेला टिप्पर अपघातात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पोलिसांनी टिप्पर चालक अदृश्यप्पा गंगय्या मास्तमरडी (रा. प्रभूनगर, ता. खानापूर, सध्या कणबर्गी, Belgaum) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अपघात केल्याची कबुली दिली. वैज्ञानिक व तांत्रिक तपासातूनही संबंधित टिप्परच अपघातास कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले.

आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

या गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या मारीहाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे Belgaum शहर पोलीस आयुक्त, डीसीपी (कायदा व सुव्यवस्था) आणि एसीपी यांनी कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 − two =

error: Content is protected !!