बेळगावमध्ये १ व २ डिसेंबर रोजी डीएससी भरती मेळावा; माजी सैनिकांना संधी

बेळगावमध्ये १ व २ डिसेंबर रोजी डीएससी भरती मेळावा; माजी सैनिकांना संधी

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे १ आणि २ डिसेंबर २०२६ रोजी डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (डीएससी) मध्ये भरतीसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यात मराठा लाईट इन्फंट्रीशी संबंधित नियमित सैन्यदलातील माजी सैनिक तसेच टेरिटोरियल आर्मी (टीए) कर्मचाऱ्यांना सहभागी होता येणार आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे सोल्जर जनरल ड्युटी (GD) आणि सोल्जर क्लर्क (SD) या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मात्र, ही भरती केवळ मराठा लाईट इन्फंट्रीशी संबंधित पात्र माजी सैनिकांसाठीच मर्यादित आहे.

सोल्जर जनरल ड्युटी पदासाठी माजी सेवेतून निवृत्त झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत पुनर्नियुक्तीसाठी पात्र असणे आवश्यक आहे. तर सोल्जर क्लर्क (SD) पदासाठी निवृत्तीच्या तारखेपासून पाच वर्षांच्या आत पुनर्नियुक्ती होणे आवश्यक आहे.

वयोमर्यादेनुसार, सोल्जर जनरल ड्युटी पदासाठी भरतीच्या दिवशी उमेदवाराचे वय ४६ वर्षांपेक्षा कमी, तर सोल्जर क्लर्क (SD) पदासाठी ४८ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी १ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भरतीसंबंधी अधिक माहिती आणि आवश्यक तपशीलांसाठी इच्छुक उमेदवारांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + 13 =

error: Content is protected !!