बेळगावात मराठा एलआयआरसी येथे डीएससी भरती रॅली; माजी सैनिकांना सुवर्णसंधी

बेळगावात मराठा एलआयआरसी येथे डीएससी भरती रॅली; माजी सैनिकांना सुवर्णसंधी

बेळगाव, दि. ५ :
दि मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (MARATHA LIRC), बेळगाव येथे १५ व १६ जून २०२६ रोजी डीएससी (Defence Security Corps) भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती नियमित सैन्य व टेरिटोरियल आर्मी (TA) मधून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी असून Soldier General Duty (GD) आणि Soldier Clerk (SD) पदांसाठी भरती होणार आहे.

सदर भरतीसाठी केवळ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये सेवा बजावलेले माजी सैनिक पात्र असतील, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी १५ जून रोजी सकाळी ८ वाजता मराठा एलआयआरसी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पात्रता अटी पुढीलप्रमाणे :

  • उमेदवारांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये सेवा केलेली असावी.
  • सेवामुक्त होताना चारित्र्य “Exemplary” किंवा “Very Good” असणे आवश्यक.
  • संपूर्ण सेवाकाळात दोनपेक्षा अधिक Red Ink Entries नसाव्यात.
  • Army Act कलम 34, 35, 36, 37 व 41(2) अंतर्गत शिक्षा झालेली नसावी.
  • मागील पाच वर्षांत Red किंवा Black Ink शिक्षा नसावी.
  • मागील तीन वर्षांत कोणतीही Red Ink Entry नसावी.
  • उमेदवारांनी किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी.
  • Soldier GD साठी पुनर्नियुक्तीची मुदत निवृत्तीनंतर दोन वर्षांच्या आत असावी.
  • Soldier Clerk (SD) साठी पुनर्नियुक्तीची मुदत निवृत्तीनंतर पाच वर्षांच्या आत असावी.
  • वैद्यकीय श्रेणी SHAPE-I असणे बंधनकारक.
  • सेवामुक्ती ही सेवाकाल पूर्ण झाल्यानंतर किंवा स्वतःच्या विनंतीवर झालेली असावी.
  • शैक्षणिक पात्रता : किमान दहावी उत्तीर्ण किंवा नॉन-मॅट्रिक उमेदवारांसाठी ACE-III आवश्यक.
  • वयोमर्यादा :
    • Soldier GD – ४६ वर्षांखाली
    • Soldier Clerk (SD) – ४८ वर्षांखाली

आवश्यक कागदपत्रे :

भरतीवेळी उमेदवारांनी खालील कागदपत्रे सादर करावीत :

  • मूळ Discharge Book
  • सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी / नॅटिव्हिटी प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायत सरपंच व पोलीस पाटील यांच्या सहीसह चारित्र्य प्रमाणपत्र
  • कुटुंबीयांचा संयुक्त फोटो (नाव, नाते व जन्मतारीख नमूद असलेला)
  • Army Group Insurance Certificate
  • सर्व कागदपत्रांच्या दोन सत्यप्रत
  • १५ पासपोर्ट साईज रंगीत फोटो
  • पोलीस अधीक्षकांनी दिलेले Verification Certificate
  • PPO
  • TA उमेदवारांसाठी Embodied / Disembodied Service Certificate व ATC Certificate

याशिवाय Combined Physical Test (CPT) साठी उमेदवारांनी Combat Dress आणि Boot DMS सोबत आणावेत, असेही सूचित करण्यात आले आहे.

मराठा एलआयआरसी प्रशासनाने पात्र माजी सैनिकांनी वेळेत उपस्थित राहून या भरती प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × one =

error: Content is protected !!