चिन्मयी उप्पार ‘पर्ल ऑफ ज्ञानसागर’ची मानकरी; सृष्टी हलकर्णी ‘रायजिंग स्टार’, प्रत्यक्ष घिवारी ‘विद्यार्थी रत्न’

चिन्मयी उप्पार ‘पर्ल ऑफ ज्ञानसागर’ची मानकरी; सृष्टी हलकर्णी ‘रायजिंग स्टार’, प्रत्यक्ष घिवारी ‘विद्यार्थी रत्न’

बेळगाव : ज्ञानसागर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदाही आपल्या गुणवत्तेची चमक दाखवत विविध पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. शाळेची विद्यार्थिनी चिन्मयी केंपन्ना उप्पार हिला ‘पर्ल ऑफ ज्ञानसागर 2025-26’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर सृष्टी संतोष हलकर्णी हिने ‘रायजिंग स्टार अवॉर्ड 2025-26’ पटकाविला आणि प्रत्यक्ष आनंद घिवारी याला ‘विद्यार्थी रत्न 2025-26’ या पुरस्काराचा मान मिळाला.

समर्थनगर प्रभागाच्या नगरसेविका नेत्रा भागवत, निवृत्त आर्मी पोलीस परशराम बेकवाडकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष कणेरी, मराठी युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव तसेच पत्रकार रवींद्र जाधव यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात विविध विभागांतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. नर्सरी विभागात 100 टक्के गुणांसह सृष्टी हलकर्णी, शौर्य शेठ, सुकृती कंग्राळकर, सानवी उप्पार आणि स्वराज्य जालगार यांनी प्रथम क्रमांक मिळविला. क्रिशा बैलाप्पगोळ हिने द्वितीय क्रमांक पटकाविला, तर श्रीसैल वस्त्रद आणि धृती शिगिहळ्ळी यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक मिळविला.

एलकेजी विभागात प्रत्यक्ष आनंद घिवारी प्रथम, अरुंधती कम्मार द्वितीय, तर आराध्या भातकांडे, आरोही मडीवाळ आणि अमित विटेकर यांनी अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळविला.

युकेजी विभागात 100 टक्के गुणांसह चिन्मयी उप्पार प्रथम ठरली. प्रमिता बुल्ली (99.08%) हिने द्वितीय, दिव्यांश प्रजापती तृतीय आणि आरोही बांडगी हिने चतुर्थ क्रमांक मिळविला.

‘पर्ल ऑफ ज्ञानसागर’ पुरस्काराची मानकरी चिन्मयी उप्पार हिने आपल्या मनोगतात यशामागील मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नगरसेविका नेत्रा भागवत यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला शिक्षिका सुधा मुचंडी, स्वाती कंग्राळकर तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 4 =

error: Content is protected !!