चव्हाटगल्लीत अग्नितांडवाने सहा जणांचा बळी; उपचार घेत असलेल्या बाप-लेकाचाही मृत्यू

चव्हाटगल्लीत अग्नितांडवाने सहा जणांचा बळी; उपचार घेत असलेल्या बाप-लेकाचाही मृत्यू

बेळगाव : गणेशोत्सवाच्या उत्साहात चव्हाटगल्लीत घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने दमोने कुटुंबावर काळाचा घाला घातला. या दुर्घटनेत आधीच एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत असलेले वडील गजानन दमोने आणि मुलगा रोशन दमोने यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चव्हाटगल्लीत घराला लागलेल्या भीषण आगीत भारती राजाराम दमोने (५०), शारदा गजानन दमोने (४५), प्रिया गजानन दमोने (२८) आणि गंगा गजानन दमोने (२५) यांचा मृत्यू झाला होता. या चौघींवर अंत्यसंस्कारही करण्यात आले.

दरम्यान, या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले गजानन दमोने आणि रोशन दमोने यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे या भीषण दुर्घटनेतील मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे.

गणेशोत्सवाचा सण साजरा होत असतानाच घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण चव्हाटगल्लीत शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत असून, दमोने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 2 =

error: Content is protected !!