मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे पारंपारिक शिवजयंतीला दिमाखात सुरुवात; १०७ वे वर्ष उत्साहात

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे पारंपारिक शिवजयंतीला दिमाखात सुरुवात; १०७ वे वर्ष उत्साहात

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, बेळगाव यांच्या वतीने ऐतिहासिक पारंपारिक शिवजयंती उत्सवाचे १०७ वे वर्ष आज मोठ्या उत्साहात आणि दिमाखात सुरू झाले. सकाळी सात वाजल्यापासून धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे विविध गडकिल्ल्यांवरून आलेल्या शिवज्योतींचे भव्य स्वागत करण्यात आले.

या स्वागत सोहळ्यास मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष तसेच मंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे, कार्यवाह मदन बामणे, उपाध्यक्ष गणेश दड्डीकर, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, शहापूर महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, राजू मोरे, बाबू कोले, अनिल अमरोळे, विकास कलघटगी, राजू मरवे, उमेश पाटील, मोतेस बारदेसकर आदी उपस्थित होते.

यानंतर नरगुंदकर भावे चौक येथील मंडपामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी उद्योजक शिरीष गोगटे यांनी मंडळाला गणेश मूर्ती भेट दिली. पुढे छत्रपती शिवाजी उद्यान, शहापूर येथे शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती व अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, विविध मान्यवर व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर, रणजीत चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुस्कर, अमर येळूरकर, नेताजी जाधव, किरण जाधव, गणेश दड्डीकर, रमेश पावले, बाळाराम पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणु किल्लेकर, शिवानी पाटील, विकास कलघटगी, राजू मोरे, गजानन पाटील, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, राजू बिरजे, प्रशांत भातकांडे, अमित देसाई, उमेश पाटील, अशोक चिंडक, पी. जी. घाडी, बाबू कोले, अनिल अमरोळे, सुनील मुरकुटे, सतीश देसाई, विनोद आंबेवाडीकर, किरण हुद्दार, सुरज कुडूचकर, सचिन केळवेकर, प्रतीक पाटील, श्रीकांत कदम, हिरालाल चव्हाण, श्रीकांत प्रभू, साईराज जाधव, साईनाथ शिरोडकर, वासू सामजी आदींचा समावेश होता.

पारंपारिक शिवजयंतीच्या या सोहळ्यामुळे संपूर्ण शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. 🚩

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × two =

error: Content is protected !!