मराठी विद्यानिकेतन मैदानावर आज सायंकाळी ४.३० वाजता ऐतिहासिक सोहळा
बेळगाव : प्रतिनिधी
बेळगावच्या ऐतिहासिक दसरा उत्सवाची परंपरा जपत विजयादशमीनिमित्त मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी मराठी विद्यानिकेतन मैदानावर सायंकाळी ४.३० वाजता सिमोल्लंघन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला बेळगावकरांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर यांनी केले आहे.
बेळगावच्या दसरा उत्सवाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असून, सिमोल्लंघन सोहळा हा या परंपरेतील महत्त्वाचा भाग आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून शहराचा ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक परंपरा जपली जाते. दरवर्षी विजयादशमीच्या निमित्ताने नागरिकांमध्ये या उत्सवाबद्दल उत्साहाचे वातावरण असते.
“परंपरा ऐतिहासिक, दसरा उत्सवाचा अभिमान!”
“परंपरा ऐतिहासिक, दसरा उत्सवाचा अभिमान, बेळगावच्या सिमोल्लंघनाने वाढवूया संस्कृतीचा मान,” या संदेशातून महामंडळाने नागरिकांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बेळगावच्या ऐतिहासिक दसरा परंपरेचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे निमंत्रणात नमूद करण्यात आले आहे.
विजयादशमीच्या या मंगलमय पर्वावर बेळगावकरांनी एकत्र येऊन ऐतिहासिक सिमोल्लंघन सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि शहराच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा मान वाढवावा, असे सस्नेह निमंत्रण मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर यांनी दिले आहे.
