ऐतिहासिक सीमोल्लंघन सोहळ्यानंतर जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे स्वच्छता मोहीम

ऐतिहासिक सीमोल्लंघन सोहळ्यानंतर जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे स्वच्छता मोहीम

ज्योती कॉलेज मैदानाची स्वच्छता; अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्यासह २० सदस्यांचा सहभाग

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव येथील ज्योती कॉलेज मैदानावर ऐतिहासिक सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव ठेवून ग्रुपच्या २० सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेत मैदानावरील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला.

सीमोल्लंघन सोहळ्यानंतर मैदानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पसरला होता. याची दखल घेत जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या सदस्यांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. गोळा केलेला कचरा महानगरपालिकेमार्फत योग्य विल्हेवाट लावता यावी, यासाठी एका ठिकाणी एकत्र करून ठेवण्यात आला. सार्वजनिक कार्यक्रमानंतर परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी केले. यावेळी माजी अध्यक्ष विकास कलघटगी, उमेश पाटील आणि उपाध्यक्ष मधू बेळगावकर उपस्थित होते.

या मोहिमेत जयवंत पाटील, भाऊ किल्लेकर, दयानंद भेंडीगेरी, प्रकाश तांजी, सुनील मुरकुटे, मुकुंद महागावकर, दिगंबर किल्लेकर, पत्रकार अनंत कुचेकर, महादेव केसकर, सुनील पवार, ज्ञानेश शिंदे आणि समाजसेवक दुर्गेश मैत्री यांच्यासह इतर सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

दरम्यान, या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत प्रा. आनंद आपटेकर यांनी अध्यक्ष लक्ष्मण शिंदे आणि इतर सदस्यांचा सत्कार केला. ऐतिहासिक सीमोल्लंघन सोहळ्यानंतर मैदानाची स्वच्छता करून परिसर पूर्ववत स्वच्छ ठेवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.

सार्वजनिक कार्यक्रमांनंतर स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 2 =

error: Content is protected !!