बेळगावात सीसीबीची मोठी कारवाई; ९.५० लाखांचे हेरॉईन जप्त, तिघांना अटक

बेळगावात सीसीबीची मोठी कारवाई; ९.५० लाखांचे हेरॉईन जप्त, तिघांना अटक

बेळगाव : शहरातील तांगडी गल्ली परिसरात हेरॉईनची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीसीबी पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ९ लाख ५० हजार रुपये किमतीचे ४७.२९ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे निखिल नारायण बळ्ळारी (२४), कपिल गजानन होसुरकर (१८) आणि आकाश आनंद साळुंखे (३४), सर्व रा. बेळगाव अशी आहेत.

सीसीबीचे पीआय मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मंजुनाथ भजंत्री व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून ४६६ छोट्या पुड्यांमध्ये भरलेले ४७.२९ ग्रॅम हेरॉईन, सुमारे ७० हजार रुपये किमतीची स्कूटर, तीन मोबाईल फोन आणि रोख ३०० रुपये असा एकूण १० लाख ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हे हेरॉईन मुंबई येथील एका महिलेकडून आणल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 4 =

error: Content is protected !!