बेळगावच्या अमेय पाटील यांचा भारतातील टॉप 100 प्रभावशाली प्रिंट-पॅकेजिंग नेत्यांमध्ये गौरव

बेळगावच्या अमेय पाटील यांचा भारतातील टॉप 100 प्रभावशाली प्रिंट-पॅकेजिंग नेत्यांमध्ये गौरव

बेळगाव, दि. ५ : बेळगावमधील ‘यारबल प्रिंट-पॅक’ कंपनीचे संचालक अमेय पाटील यांचा भारतातील प्रिंट आणि पॅकेजिंग उद्योगातील टॉप 100 प्रभावशाली नेत्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने नाविन्यपूर्ण पॅकेजिंग, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि प्रभावी व्यावसायिक नियोजनाच्या जोरावर उद्योग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अमेय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘यारबल प्रिंट-पॅक’ने केवळ उत्पादन क्षमतेवर भर न देता विशेष पॅकेजिंग उपाययोजना आणि दीर्घकालीन व्यावसायिक धोरणांवर लक्ष केंद्रित केले. याच धोरणाचा परिणाम म्हणून कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २० ते २३ टक्के वार्षिक विकासदर नोंदवला असून कंपनीचा EBITDA २७.५६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

कंपनीचा बहुतांश व्यवसाय एफएमसीजी (FMCG) आणि प्रीमियम फूड पॅकेजिंग क्षेत्राशी संबंधित असून एकूण महसुलातील सुमारे तीन चतुर्थांश वाटा या क्षेत्रांचा आहे. उत्पादनाचा दर्जा आणि अचूकता अधिक सक्षम करण्यासाठी कंपनीने ऑटोमेशन, डाय-कटिंग आणि फोल्डर-ग्लूअर्ससारख्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

सध्या कंपनीत १०० ते १२० कर्मचारी कार्यरत असून उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. क्षमता वाढवण्यापेक्षा उद्योगाच्या गरजेनुसार योग्य तंत्रज्ञान आणि उपकरणांची निवड करण्यावर कंपनीचा भर असल्याचे अमेय पाटील यांनी सांगितले.

व्यावसायिक शिस्त, स्पष्ट उद्दिष्टे आणि बाजारपेठेचा अचूक अभ्यास यांवर आधारित नियोजन केल्यासच दीर्घकालीन यश मिळू शकते. त्यामुळे मूल्यनिर्मिती करणाऱ्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊनच गुंतवणूक करण्याचे धोरण आम्ही अवलंबत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सन्मानाबद्दल अमेय पाटील यांनी ग्राहक, सहकारी कर्मचारी आणि कुटुंबीयांचे आभार मानले. हा गौरव उद्योग क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामगिरीसाठी अधिक प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
English slug

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − sixteen =

error: Content is protected !!