‘बेळगावचा कैवारी’च्या मुहूर्त मेढ सोहळ्याने रौप्य महोत्सवी वर्षाची दिमाखदार सुरुवात

‘बेळगावचा कैवारी’च्या मुहूर्त मेढ सोहळ्याने रौप्य महोत्सवी वर्षाची दिमाखदार सुरुवात

बेळगाव : केळकर बाग येथील प्रसिद्ध ‘बेळगावचा कैवारी’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या रौप्य महोत्सवी अर्थात २५व्या वर्षाची दिमाखदार सुरुवात मंडपाच्या मुहूर्त मेढ सोहळ्याने झाली. उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला.

यंदाचा गणेशोत्सव मंडळाचे २५वे वर्ष असल्याने तो विशेष भव्य-दिव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. मुहूर्त मेढ सोहळ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश परेश शिंदे, उपाध्यक्ष आदित्य मुतगेकर, खजिनदार संजय गवाडे, सचिव दीपक ओझा आणि जनरल सेक्रेटरी परेश शिंदे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रकाश उसुलकर, गुरुनाथ किर्मटे, ज्योतिबा उसुलकर, गणपत उसुलकर, राजू लासे, आकाश मनुरकर, वैभव धमणेकर, तसेच माऊली महिला मंडळ, प्राजक्ता शिंदे, कल्पना उसुलकर, आरती ओझा, श्री. कासळकर, संजय पाटील यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन

‘बेळगावचा कैवारी’ मंडळाचा २५वा वर्धापन सोहळा अविस्मरणीय आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक विविध उपक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात येणार आहे.

गेल्या २५ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि भक्तीची ज्योत अखंड तेवत ठेवणाऱ्या ‘बेळगावचा कैवारी’ मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षाकडे बेळगावकरांचे विशेष लक्ष लागले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight − 7 =

error: Content is protected !!