बेळगावात २२ सप्टेंबरला ‘टॉप-१० करेला’ स्पर्धा; विजेत्यांना रोख पारितोषिके

बेळगावात २२ सप्टेंबरला ‘टॉप-१० करेला’ स्पर्धा; विजेत्यांना रोख पारितोषिके

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ, लोकमान्य टिळक मार्ग, झेंडा चौक मार्केट यांच्या वतीने आणि बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने ‘दहावी टॉप-१० करेला स्पर्धा फॉर मेन-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. माजी रावसाहेब गोगटे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता रामनाथ मंगल कार्यालय, पहिला क्रॉस, भाग्यनगर, टिळकवाडी येथे होणार आहे.

मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते १९०५ मध्ये प्रारंभ झाल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. यंदाच्या १२२व्या श्री गणेशोत्सवानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

टॉप-१० विजेत्यांसाठी रोख पारितोषिके

स्पर्धेतील टॉप-१० विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ४ हजार, ३ हजार, २ हजार ५००, २ हजार आणि त्यानंतर पाच विजेत्यांना प्रत्येकी १ हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण १० विजेत्यांना रोख पारितोषिके मिळणार आहेत.

स्पर्धेसाठी विविध नियम

ही स्पर्धा खुल्या गटात घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी आयोजकांनी निवडलेला करेला वापरणे बंधनकारक असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. स्पर्धकांकडून २०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियम व अटी बदलण्याचा अधिकार आयोजक मंडळाकडे राहणार असून पंचांचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धकांनी स्पर्धेच्या वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्यास संबंधित स्पर्धकाला स्पर्धेतून निलंबित करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहणार आहे.

स्पर्धकांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत आपली नावे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या वेळी स्पर्धक वेळेत उपस्थित न राहिल्यास त्याचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नसल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

नाव नोंदणीसाठी संपर्क

स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी अजित सिद्दण्णावर – ९८४४०६३०४३, एम. गंगाधर – ९८४५८५७२३० आणि सुनील राऊत – ९६२०४०७७०० यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धेच्या आयोजनासाठी बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष आर.टी.एन. अविनाश पोतदार यांच्यासह मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत. अधिक माहितीसाठी हेमंत हावळ, अमित किल्लेकर आणि राजू हंगिरेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × five =

error: Content is protected !!