बेळगावात उद्या जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन

बेळगावात उद्या जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनतर्फे तसेच मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळाच्या सहकार्याने २२ सप्टेंबर रोजी जिल्हा व ग्रामीण स्तरावरील बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमान्य टिळक मार्ग, झेंडा चौक मार्केट येथील मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा रामनाथ मंगल कार्यालय, पहिला क्रॉस, भाग्यनगर, टिळकवाडी, बेळगाव येथे होणार आहे. स्पर्धेला दुपारी ४ वाजता सुरुवात होणार आहे.

स्पर्धा IBBF च्या नियमांनुसार घेण्यात येणार असून बॉडी बिल्डिंगसाठी ५५, ६०, ६५, ७०, ७५ आणि ७५ किलोपेक्षा अधिक अशा सहा वजन गटांचा समावेश आहे. तसेच ग्रामीण स्तरावर ६०, ६५, ७० आणि ७० किलोपेक्षा अधिक असे चार वजन गट ठेवण्यात आले आहेत. याशिवाय मॉडेल फिटनेसचा एक गटही असणार आहे.

प्रत्येक गटातील प्रथम पाच विजेत्यांना रोख पारितोषिकांसह आकर्षक ट्रॉफी व गिफ्ट हॅम्पर देण्यात येणार आहेत. बॉडी बिल्डिंग स्पर्धेतील विजेत्याला ११ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार असून बेस्ट पॉझरसाठीही स्वतंत्र पारितोषिक ठेवण्यात आले आहे. ग्रामीण स्तरावरील विजेत्यास ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी विविध मान्यवर, पदाधिकारी, प्रायोजक व क्रीडाप्रेमी उपस्थित राहणार असून बेळगाव जिल्ह्यातील शरीरसौष्ठवपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी आयोजक अजित सिद्दण्णावर (९८४४०६३०४३) तसेच इतर आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + ten =

error: Content is protected !!