शिवजयंती उत्सव शांततेत; विकास कलघाटगी यांना पोलीस विभागाकडून प्रशस्ती

शिवजयंती उत्सव शांततेत; विकास कलघाटगी यांना पोलीस विभागाकडून प्रशस्ती

बेळगाव : शहरातील शिवजयंती उत्सव आणि भव्य चित्ररथ मिरवणूक यंदा उत्साहात आणि पूर्णतः शांततेत पार पडली. या यशामागे विविध संघटना, कार्यकर्ते आणि प्रशासनाचा समन्वय महत्त्वाचा ठरला. विशेषतः शिवजयंती मंडळ आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधणारे यांची भूमिका उल्लेखनीय ठरली.

या कार्याची दखल घेत पोलीस विभागाने त्यांना प्रशंसापत्र देऊन गौरव केला. 21 एप्रिल 2026 च्या सायंकाळपासून 22 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील विविध भागांत मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी उत्तम समन्वय राखला.

स्थानिक परिस्थितीबाबत वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करून कलघाटगी यांनी पोलीस यंत्रणेला मोलाचे सहकार्य केले. याबद्दल पोलीस आयुक्त यांनी त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित केले.

यापूर्वीही गणेशोत्सव काळात त्यांनी दिलेल्या सहकार्याचा उल्लेख करत पोलीस आयुक्तांनी त्यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले. तसेच पुढील काळातही असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

शिवजयंती उत्सव शांततेत पार पडण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी दिलेल्या सहकार्यामुळे बेळगाव शहराने पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − thirteen =

error: Content is protected !!