बेळगावात सार्वजनिक ठिकाणी नशा करून वावर; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

बेळगावात सार्वजनिक ठिकाणी नशा करून वावर; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

बेळगाव : शहरातील विविध भागात सार्वजनिक ठिकाणी नशेच्या अवस्थेत आढळलेल्या तिघांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. 17 एप्रिल 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली.

पहिल्या घटनेत अनंत मारुती लोहार (वय 23, शाहापूर) हा उद्योगभागातील एसबीआय बँकेजवळ संशयास्पद अवस्थेत आढळला. वैद्यकीय तपासणीत तो अमली पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 43/2026 अंतर्गत एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत सुकेश दीपक हलदणकर (वय 24, स्वामीनाथ कॉलनी) हा सुभाषचंद्र गार्डन परिसरात नशेत वावरताना आढळला. त्याच्यावरही गुन्हा क्रमांक 44/2026 अंतर्गत एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

तिसऱ्या प्रकरणात निखिल बसवराज हंपन्नावर (वय 24, बसवाड) हा हिरेबागेवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी नशेच्या अवस्थेत आढळला. त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 77/2026 नोंदवण्यात आला आहे.

या सर्वांवर एनडीपीएस कायद्यातील कलम 27(ब) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिस पथकाच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 2 =

error: Content is protected !!