केंद्र सरकारच्या विविध विकासकामांचा खासदार जगदीश शेट्टर यांनी घेतला आढावा

केंद्र सरकारच्या विविध विकासकामांचा खासदार जगदीश शेट्टर यांनी घेतला आढावा

बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनी मंगळवारी रेल्वे विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि विमानतळ प्राधिकरणाच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा

हलगा–मच्छे बायपास ९ किलोमीटरच्या हलगा–मच्छे बायपास मार्गावर सुमारे ४ किलोमीटरपर्यंत डांबरीकरण पूर्ण झाले असून सेवा रस्त्यांचे काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.

बेळगाव–हुनगुंद–रायचूर महामार्ग पॅकेज-१ अंतर्गत ४३.८ किलोमीटरच्या रस्ते प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पासाठी सुमारे ३७ किलोमीटर जमीन संपादन पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना सुमारे २७० कोटी रुपयांची भरपाई वितरित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. संपूर्ण प्रक्रिया फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पॅकेज-२ अंतर्गत ४६.१ किलोमीटरच्या कामासाठी सुमारे ३८ किलोमीटर जमीन संपादन पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना सुमारे २ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. जमीन संपादन प्रक्रियेमधील काही अडचणी खासदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या असून त्यावर चर्चा करण्यात आली.

बैलहोंगल तालुक्यातील नागनूर आणि भाविहाळ गावातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सेवा रस्ते आणि जनावरांसाठी क्रॉसिंगची सुविधा उभारण्याच्या सूचना शेट्टर यांनी NHAI अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव–संकेश्वर सहापदरीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वास आल्याची माहिती दिली.

रेल्वे विभाग

बेळगाव–कित्तूर–धारवाड नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. या प्रकल्पासाठी सुमारे १,१९० एकर जमीन आवश्यक असून त्यापैकी ४०७ एकर संपादनास PAC कडून मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र राज्य सरकारकडून निधी अद्याप न मिळाल्याने प्रकल्पाच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

तसेच टिळकवाडी येथील LC क्रमांक ३८१ जवळ दुसऱ्या मार्गाच्या बांधकामाबाबतही शेट्टर यांनी माहिती घेत अधिकाऱ्यांना काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

विमानतळ विकास

बेळगाव विमानतळ विस्तार योजनेअंतर्गत समांतर टॅक्सी ट्रॅक उभारण्यासाठी हवाई दलाकडील जमिनीची आवश्यकता असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + 17 =

error: Content is protected !!