राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या भूषण वनारसेला सुवर्ण यश; ७३ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक

राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या भूषण वनारसेला सुवर्ण यश; ७३ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक

बेळगाव : बेंगळुरू येथे आयोजित ४३ व्या कर्नाटक राज्य वरिष्ठ ज्युडो अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ मध्ये बेळगावच्या भूषण मंजुनाथ वनारसे याने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुरुष वरिष्ठ गटातील ७३ किलो वजनी गटात त्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद मिळविले.

कर्नाटक ज्युडो असोसिएशन, बेंगळुरू यांच्या वतीने ज्युडो फेडरेशन ऑफ इंडिया आणि कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशनच्या मान्यतेने तसेच कर्नाटक युवा सक्षमीकरण व क्रीडा विभागाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान बेंगळुरू येथे ही स्पर्धा पार पडली.

मूळचा अथणी येथील असलेला आणि सध्या बेळगावमध्ये वास्तव्यास असलेल्या भूषणने वरिष्ठ गटात दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. त्याच्या या यशामुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली आहे.

भूषणला बेळगाव जिल्हा युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाच्या ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील आणि ऋतुजा मुलताणी यांचे मार्गदर्शन लाभले.

भूषणच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्याचे अभिनंदन होत असून, पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + nineteen =

error: Content is protected !!