बेळगाव शहर सीसीबीची गांजा विक्रेत्यांवर कारवाई; चौघांना अटक

बेळगाव शहर सीसीबीची गांजा विक्रेत्यांवर कारवाई; चौघांना अटक

२.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव शहर सीसीबी पथकाने गांजा विक्री प्रकरणात धडक कारवाई करत चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. १९ मे २०२६ रोजी सीसीबी पथकाने ताऱीहाळ-हलगा मार्गावरील सार्वजनिक ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ओंकार यल्लप्पा कोळेकर (वय २२, रा. शिवाजी गल्ली, ताऱीहाळ), नागेंद्र शिवाजी रागीपाटील (वय २३, रा. अडवीसिद्धेश्वर गल्ली, ताऱीहाळ), प्रमोद धर्मेंद्र कसबेकर (वय १८, रा. उचगाव, कोल्हापूर, महाराष्ट्र) आणि गजानन सचिन पाटील (वय १९, रा. मंगेशनगर, उचगाव, महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.

आरोपी हे गांजा या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीसीबी विभागाचे पीआय मंजुनाथ नायक आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. यावेळी आरोपींकडून २ किलो ७७६ ग्रॅम गांजा, एक विवो मोबाईल, एक ॲपल मोबाईल तसेच एक पल्सर मोटारसायकल असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०४/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, ही कारवाई यशस्वीपणे पार पाडणाऱ्या सीसीबी पथकाचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × one =

error: Content is protected !!