सेंट्रल रेल्वेच्या जनरल चॅम्पियनशिप विजयात मोलाचे योगदान
बेळगाव : कोलकाता येथील आसनसोलमध्ये पार पडलेल्या ५९ व्या अखिल भारतीय आंतररेल्वे नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत (59th All India Inter Railway Shooting Championship) सेंट्रल रेल्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोल्हापूरच्या राधिका बराले (हवालदार) हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १० मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात तिने सांघिक कांस्यपदक पटकावून आपल्या कौशल्याची छाप पाडली.
राधिकाने अचूक नेमबाजी आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सेंट्रल रेल्वेच्या पदकप्राप्तीत महत्त्वाचे योगदान दिले. विशेष म्हणजे, सेंट्रल रेल्वेला या स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिपचा मान मिळवून देण्यातही तिचा मोलाचा वाटा ठरला. तिच्या या यशामुळे रेल्वेच्या क्रीडा क्षेत्रातून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान, राधिका बराले आणि रोहित हवालदार यांचा सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, सुनीता सावंत आणि वंदना बाळेकुंद्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी राधिकाच्या यशाचे कौतुक करून तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राधिकाच्या या यशामुळे बेळगाव आणि परिसराच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
