बेळगाव व चंदगड परिसरातील ६२ विद्यार्थ्यांचा सहभाग; श्रेया काकतकर हिने पटकाविला प्रथम क्रमांक
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि मराठी विद्यानिकेतन, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महात्मा फुले आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. २४ नोव्हेंबर रोजी मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये झालेल्या या स्पर्धेत बेळगाव आणि चंदगड परिसरातील एकूण ६२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून प्रा. प्रसाद वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विद्यानिकेतनच्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी केले.
स्पर्धेसाठी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांची सद्यस्थितीत गरज आहे का?, एल निनोचे संकट आणि समाजप्रबोधन, तसेच डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांचे कार्य असे विषय देण्यात आले होते.
स्पर्धेचे परीक्षण मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, मराठा महिला संघाच्या अध्यक्षा डॉ. संजीवनी खंडागळे, पंडित नेहरू कॉलेजचे प्रा. मयूर नागेनट्टी आणि भाऊराव काकतकर कॉलेजचे प्रा. प्रसाद वाडेकर यांनी केले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :
- प्रथम क्रमांक : श्रेया सुरेश काकतकर (जिजामाता हायस्कूल, चव्हाट गल्ली)
- द्वितीय क्रमांक : प्रेरणा विजय पाटील (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
- तृतीय क्रमांक : भक्ती गंगाराम केन्नुरकर (वाघवडे हायस्कूल, वाघवडे)
उत्तेजनार्थ पारितोषिके :
- गौतम विनोद डिचोलकर (राजर्षी शाहू हायस्कूल, ओलमणी)
- तृप्ती यशवंत म्हाकेकर (भाई दाजीबा देसाई हायस्कूल, पार्ले)
- सृजन अनिल पाटील (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
- समृद्धी परशराम पाटील (शिवराज हायस्कूल, बेनकनहळ्ळी)
- कृतिका लक्ष्मण मोहनगेकर (सरस्वती हायस्कूल, हंदिगनूर)
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षक समन्वयक सविता पवार, शिक्षण संयोजिका नीला आपटे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, आंतरशालेय स्पर्धा विभागप्रमुख मुक्ता आलगोंडी, शाहीन शेख, सांस्कृतिक विभागप्रमुख धीरजसिंह राजपूत, संगणक विभागप्रमुख श्रुती बेळगावकर आणि अटल लॅब प्रमुख श्वेता सुर्वेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त २८ नोव्हेंबर २०२६ रोजी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरजसिंह राजपूत यांनी केले, तर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी आभार मानले.
