बेळगावात २५ व २६ जानेवारीला १३ वी सतीश शुगर क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धा

बेळगावात २५ व २६ जानेवारीला १३ वी सतीश शुगर क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धा

दक्षिण भारत व जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे सरदार हायस्कूल मैदानावर आयोजन

बेळगाव : कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स (KABB) यांच्या वतीने १३ वी ‘सतीश शुगर क्लासिक – २०२७’ दक्षिण भारतस्तरीय व जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन २५ व २६ जानेवारी २०२७ रोजी बेळगाव येथे करण्यात येणार आहे.

कॉलेज रोडवरील सरदार हायस्कूल मैदानावर ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्सचे कार्याध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धन्नावर यांनी २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.

या स्पर्धेच्या निमित्ताने १३ व्या ‘सतीश शुगर अवॉर्ड्स’ कार्यक्रमात २२ नोव्हेंबर रोजी यमकनमर्डी येथे स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ही स्पर्धा सतीश जारकीहोळी फाउंडेशन, गोकाक यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.

या पोस्टर अनावरण कार्यक्रमाला राहुल सतीश अण्णा जारकीहोळी, किरण राजपूत, रियाज चौगुले, सुरेश जोरापूर, अजित सिद्धन्नावर, सुनील आपटेकर, एम. गंगाधर, गणेश गुंडाप, सुनील पवार, सुनील राऊत, आकाश हुलियार, नागराज कोलकर, शेखर जानवेकर, प्रशांत खन्नुकर, प्रताप कलकुंद्रिकर, नागेंद्र मडिवाळ, सुनील भातकांडे आणि शुभम पाटील आदी उपस्थित होते.

कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्सला राज्याच्या क्रीडा व युवक सेवा मंत्रालयाची मान्यता असून, ही संस्था इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनशी संलग्न आहे. या स्पर्धेमुळे शरीरसौष्ठवपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + 15 =

error: Content is protected !!