नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या घरावर पुन्हा हल्ला; मागील दरवाजाची तोडफोड

नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या घरावर पुन्हा हल्ला; मागील दरवाजाची तोडफोड

बेळगाव : समितीच्या नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या भांदूर गल्ली येथील घरावर रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून मागील दरवाजाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्यांनी खडेबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

विशेष म्हणजे, गणेशोत्सव काळातही त्यांच्या घराच्या समोरील दरवाजाची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा घरावर हल्ला झाल्याने भातकांडे कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 15 =

error: Content is protected !!