संविधान दिनानिमित्त बेळगावात सलोनी पाटील यांचे व्याख्यान

संविधान दिनानिमित्त बेळगावात सलोनी पाटील यांचे व्याख्यान

बेळगाव – राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि प्रगतिशील लेखक संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे औचित्य साधून ‘भारताचे संविधान’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सलोनी शिवराज पाटील या व्याख्यानातून भारतीय संविधानाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

हा कार्यक्रम गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता रामदेव गल्ली येथील कार पार्किंगजवळ असलेल्या गिरीष कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात होणार आहे. प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद मेणसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

या व्याख्यानाचा लाभ नागरिक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि संविधानप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन संघाचे उपाध्यक्ष अनिल आजगावकर आणि सचिव कृष्णा शहापूरकर यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × two =

error: Content is protected !!