मराठी विद्यानिकेतनच्या २००१ मधील दहावी ‘ब’ वर्गाचा स्नेहमेळावा उत्साहात

मराठी विद्यानिकेतनच्या २००१ मधील दहावी ‘ब’ वर्गाचा स्नेहमेळावा उत्साहात

बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सन २००१ मधील दहावी ‘ब’ वर्गाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा १४ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला भेट देत शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली. बालदिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले.

स्नेहमेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांनी बालपणीचे विविध खेळ खेळत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले.

याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष सुभाष ओउळकर यांनी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार तसेच शाळेचे माजी शिक्षक उपस्थित होते.

जुन्या आठवणी, शिक्षकांप्रती कृतज्ञता आणि शाळेच्या ऋणांची जाणीव अशा भावनिक वातावरणात हा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × three =

error: Content is protected !!