सांबरा मराठी शाळेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या नियोजनासाठी रविवारी माजी विद्यार्थ्यांची बैठक

सांबरा मराठी शाळेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या नियोजनासाठी रविवारी माजी विद्यार्थ्यांची बैठक

सांबरा : येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेला 150 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी रविवार, दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता शाळेच्या सभागृहात माजी विद्यार्थ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सांबरा येथे 1877 साली सरकारी प्राथमिक मराठी शाळेची स्थापना करण्यात आली. तब्बल दीडशतकाची परंपरा लाभलेल्या या शाळेने अनेक पिढ्यांना शिक्षणाचे धडे दिले आहेत. शाळेच्या स्थापनेला 150 वर्षे पूर्ण होत असल्याने हा ऐतिहासिक टप्पा उत्साहात साजरा करण्याचा मानस आहे.

या महोत्सवाचे स्वरूप, नियोजन आणि विविध उपक्रम यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तरी शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी बैठकीला आवर्जून उपस्थित राहून आपले विचार व सूचना मांडाव्यात, असे आवाहन शाळा सुधारणा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − 13 =

error: Content is protected !!