बेळगाव : बिर्ला इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दक्षिण विभागातील स्केटर्सनी आघाडी घेतली. या स्पर्धेत बेळगावच्या सौरभ साळोखे याने ५०० मीटर स्केटिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
स्पर्धेच्या पहिल्या दिवसातील विविध गटांतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :
सुवर्णपदक विजेते : चिनॉय मलिक, काम्या शर्मा, शौर्य भूषण तिवारी, दिव्यांशी बिश्नोई, एक जडन जयेश, साधुरिका एम., पी. व्ही. मोती, प्रवण जे., सुदर्शनी के. एस., दिव्य गणपती के. आर., हीरा चोप्रा, उदित टाक्या, व्ही. कारनिथा, सानिध्या सिन्हा, मानवी त्यागी, के. ओजस्वी, शंतनू अग्रवाल, तेजश्री यू., अभिमन्यू चौहान, आणिका कर आणि सौरभ साळोखे.
रौप्यपदक विजेते : मोक्षिथ एन. बी., सेलिना मॅडिसन एस., रिहान राजू पवन, याझिनी श्री वाय., अभय, तारिका एस., जेस्निया कोरिया, अंशुमन बघेल, अबित कुमार जी., अमृत पी., टी. डी. जॅस्विक, आहाना गुप्ता, एस. डी. दारुण कीर्तिक, पजेया हर्षिनी, सूरज स्वेन, विशाल देव गोस्वामी, अनुष्का त्यागी, आदित्य शंकर आर. आणि मधुमिथा वि.
कांस्यपदक विजेते : के. हंसीत, मायशा डॅनिश, अलिट जेम्स, कृती एस. ऐथल, मनसेहज सिंग, अभ्य शर्मा, के. पवन सर्जा, भगीरथ प्रताप सिंग, सिया मलिक, एस. जीवेश, सी. प्रतिक्षा, हार्दिक कन्ना पी., ब्रिजोध कौर, श्रीजित, ऐश्वर्या जे., आर्या गुडूर, अरणा प्रसाद, रुदा चौधरी आणि प्रेक्षा सोलंकी.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, शल्य तारळेकर तसेच बिर्ला इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक, कर्मचारी आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
