मुंबईतही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन; बेळगाव, बिदर, भालकीसह सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची मागणी!

मुंबईतही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन; बेळगाव, बिदर, भालकीसह सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची मागणी!

मुंबई : प्रतिनिधी

बेळगाव, बिदर, भालकीसह संपूर्ण मराठीबहुल सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी १ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील करी रोड नाका येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन पाळण्यात आला. फलक दाखवून कर्नाटक सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी ‘बेळगाव, बिदर, भालकीसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट झालाच पाहिजे’, अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी दिलीप मिस्त्री यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला सीमाप्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बेळगाव सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवून सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रात समाविष्ट करण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

पिराजी पाटील यांनीही महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाच्या संदर्भात लवकरात लवकर ठोस भूमिका घेऊन निर्णय घ्यावा, असे मत व्यक्त केले.

या आंदोलनात मधुकर पाटील, दिलीप मिस्त्री, पिराजी पाटील, गजानन साळुंखे, अशोक सावंत, जयवंत पाटील, शिवाजी कुराडे, चंद्रकांत कालकुंद्रे, अमित पाटील, रानाबा देशवळ, मोहन कळविकट्टे, विठ्ठल कुराडे, शिवसेना शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सीमाभागाचा प्रश्न सुटेपर्यंत मराठी भाषिकांच्या न्याय्य मागणीचा आवाज लोकशाही मार्गाने बुलंद ठेवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

ok

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 2 =

error: Content is protected !!