बेळगाव : प्रतिनिधी
मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक राज्याच्या वतीने आणि ट्रेडिशनल रेसलिंग अँड प्राक्रेशन असोसिएशनच्या सहकार्याने ‘मिशन ऑलिम्पिक स्टेट लेव्हल रेसलिंग चॅम्पियनशिप 2026’ या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 27 व 28 ऑक्टोबर 2026 रोजी बेळगावातील समर्थ्य मंदिर व्यायामशाळा, बुधवार पेठ, टिळकवाडी येथे होणार आहे.
स्पर्धेत अंडर-11, अंडर-14, अंडर-17, अंडर-19 आणि वरिष्ठ गटातील पुरुष व महिला कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत वजन तपासणी होणार असून, सकाळी 11 वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होईल. सायंकाळी 4 वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून स्पर्धेचे सामने सुरू होतील, तर दुपारी 4 वाजता समारोप समारंभ होणार आहे.
अंडर-11 मुलांच्या गटात 20, 25, 30, 35 व 40 किलो, अंडर-14 मध्ये 35, 41, 48, 52, 57, 62 व 68 किलो, तर अंडर-17 मध्ये 45, 51, 55, 60, 65, 71 व 80 किलो वजनगटांचा समावेश आहे. अंडर-19 मुलांच्या गटात 57, 65, 70, 74, 79, 86 व 97 किलो, तर वरिष्ठ पुरुष गटात 60, 66, 71, 76 व 82 किलोपेक्षा अधिक वजनगट असतील.
मुलींच्या गटातही विविध वजनगट ठेवण्यात आले आहेत. अंडर-11 मध्ये 20 ते 40 किलो, अंडर-14 मध्ये 30 ते 50 किलो, अंडर-17 मध्ये 40 ते 61 किलो आणि अंडर-19 मध्ये 50 ते 65 किलोपर्यंतचे वजनगट आहेत. वरिष्ठ महिला गटात 55, 58, 61, 65 व 68 किलोपेक्षा अधिक वजनगटांचा समावेश आहे.
स्पर्धेसाठी आधारकार्ड आणि जन्म प्रमाणपत्र अनिवार्य असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. स्पर्धेची ऑनलाइन नोंदणी 7 ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत करता येणार आहे.
या स्पर्धेतील निवड चाचणीतून खेळाडूंना नोव्हेंबर 2026 मध्ये उज्जैन, मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संधी मिळणार आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी पै. अतुल शिरोळे (NIS Coach), दुंडेश मिदाकनट्टी, महेश गुंजिकर, गंगाधर एम., चेतन देसाई, शाहिना दुब्बळ, भावेश बिरजे व नागेश सुतार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
