विभागीय दसरा जलतरण स्पर्धेत तनुज सिंग, वेदा खानोलकर यांना चॅम्पियनशिप; बेळगाव संघ सर्वसाधारण विजेता

विभागीय दसरा जलतरण स्पर्धेत तनुज सिंग, वेदा खानोलकर यांना चॅम्पियनशिप; बेळगाव संघ सर्वसाधारण विजेता

बेळगाव : युवजन सेवा व क्रीडा खात्याच्या वतीने गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आयोजित करण्यात आलेल्या बेळगाव विभागीय दसरा जलतरण स्पर्धेत बेळगाव संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. पुरुष विभागात कुमार तनुज सिंग, तर महिला विभागात वेदा खानोलकर यांनी प्रत्येकी पाच सुवर्णपदकांची कमाई करत वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवली.

या विभागीय स्पर्धेत बेळगावसह धारवाड, विजयपूर, गदग, हावेरी, कारवार आणि बागलकोट जिल्ह्यांतील जलतरणपटूंनी सहभाग घेतला. विविध प्रकारांमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाच्या सर्वसाधारण विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला.

पुरुष विभागात कुमार तनुज सिंगने पाच सुवर्णपदके मिळवून चॅम्पियनशिप पटकावली. अमन सुनगारने चार सुवर्ण व एक रौप्य, आदी शिरसाठने दोन सुवर्ण व दोन रौप्य, दर्शन वरूरने एक सुवर्ण व दोन रौप्यपदके मिळवली. चिन्मय बागेवाडीने चार रौप्य, अर्णव किल्लेकर, विनय कुमार गनियाल आणि प्रज्वल हुल्लूर यांनी प्रत्येकी एक रौप्यपदक मिळवले.

महिला विभागात वेदा खानोलकरने पाच सुवर्णपदके मिळवत वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकावली. आरोही अवस्थी व साक्षी शिरळी यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके मिळवली. सायली घुगरेटकरने एक सुवर्ण व चार रौप्य, सृष्टी कंगराळकर व शर्मिष्ठा मलाई यांनी प्रत्येकी एक सुवर्ण व तीन रौप्यपदके मिळवली. स्वराली शिवनगेकर आणि भूमी भागवत यांनी प्रत्येकी एक रौप्यपदक मिळवले.

या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर वरील सर्व जलतरणपटूंची दि. ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान म्हैसूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय दसरा सीएम कप जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विजेत्या जलतरणपटूंना युवजन सेवा व क्रीडा खात्याचे डेप्युटी डायरेक्टर श्री. श्रीनिवास यांच्या हस्ते पदक, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आबा हिंद क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांच्यासह रणजीत पाटील, विजय नाईक, प्रसाद दरवंदर, किशोर पाटील, ओम घाडी, मारुती घाडी, भरत पाटील, विजय भोगन, कल्लाप्पा पाटील, अमित कुडची, शुभांगी मंगलोरकर, ज्योती पवार, विजया शिरसाठ आणि वैभव खानोलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − two =

error: Content is protected !!