ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने संजीविनी फाउंडेशनच्या स्पर्धांना रंगत

ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने संजीविनी फाउंडेशनच्या स्पर्धांना रंगत

बेळगाव : प्रतिनिधी

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून संजीविनी फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित विविध स्पर्धांना रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टिळकवाडी येथील जी. जी. चिटणीस स्कूलमध्ये सकाळी ८ वाजता स्पर्धांना प्रारंभ झाला. शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेत आपली कला, कौशल्य आणि खेळाडूवृत्तीचे दर्शन घडविले.

कॅरम, क्ले मॉडेलिंग, रांगोळी, पेटिंग, १०० मीटर धावणे, लिंबू-चमचा, मूनवॉक, सॅक रेस आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वयाची साठी ओलांडल्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांनी दाखविलेला उत्साह आणि स्पर्धात्मक भावना विशेष कौतुकास्पद ठरली.

स्पर्धेतील विजेत्यांना चेअरमन मदन बामणे, संस्थापक डॉ. सविता देगीनाळ, शुभांगी मिसाळे, सरिता कालकुंद्रीकर, तेजस पवार, रेखा बामणे, डॉ. नवीना शेट्टीगार, विद्या सरनोबत, प्रीती चौगुले आणि संजय पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्रांसह सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी चेअरमन मदन बामणे यांनी सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना केवळ विरंगुळा उपलब्ध करून देणे नसून त्यांच्या शारीरिक हालचाली, मानसिक आनंद, सामाजिक सहभाग आणि आत्मविश्वासाला चालना देणे हा आहे. स्पर्धांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी दाखविलेला उत्साह पाहून आनंद झाला असून भविष्यात या स्पर्धा आणखी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

“वय वाढते, मात्र उत्साह आणि उमेद कधीही कमी होत नाही,” याचा प्रत्यय या स्पर्धांमधून आला. संजीविनी फाउंडेशनच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजीविनी फाउंडेशन तसेच जी. जी. चिटणीस स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धांतील विजेते

कॅरम :
प्रथम – परशुराम भंडारे
द्वितीय – अनंत कुचेकर
तृतीय – दयानंद तारीहाळकर, मनोहर अंकले

क्ले मॉडेलिंग :
प्रथम – अलका अष्टेकर
द्वितीय – वनिता जोशी
तृतीय – वनिता शिरोळ

रांगोळी :
प्रथम – वासंती गोमनाचे
द्वितीय – आशा देशपांडे
तृतीय – प्रभावती मिरजकर

पेटिंग :
प्रथम – अलका अष्टेकर
द्वितीय – एन. एम. काकडे
तृतीय – रघुनाथ कुंदरी

१०० मीटर धावणे – पुरुष (६० ते ७० वर्षे) :
प्रथम – अरुण तळेबैलकर
द्वितीय – किसन यळुरकर
तृतीय – रामचंद्र गाडगीळ

१०० मीटर धावणे – महिला (६० ते ७० वर्षे) :
प्रथम – वंदना शहा
द्वितीय – नीलम दोरेण्णावर
तृतीय – वासंती गोमनाचे

१०० मीटर धावणे – ७० वर्षांवरील :
प्रथम – सूर्यकांत देवराणी
द्वितीय – विजय वाइंगडे
तृतीय – मारुती कणबरकर

लिंबू-चमचा – पुरुष (६० ते ७० वर्षे) :
प्रथम – किसन यळुरकर
द्वितीय – बाळासाहेब पाटील
तृतीय – सुरेंद्र देसाई

लिंबू-चमचा – महिला :
प्रथम – राजश्री हावळ
द्वितीय – रंजना पीसे
तृतीय – अनघा मोकाशी

मूनवॉक – ६० ते ७० वर्षे :
प्रथम – रूपा अनुपकुमार
द्वितीय – राजश्री हावळ
तृतीय – पुष्पा भोसले

मूनवॉक – ७० वर्षांवरील :
प्रथम – सुमन कब्बुर
द्वितीय – रजनी जोशी
तृतीय – रंजना पीसे

मूनवॉक – पुरुष :
प्रथम – सुरेंद्र देसाई
द्वितीय – चंद्रशेखर जोशी
तृतीय – संजीव नाईक

सॅक रेस – महिला :
प्रथम – डॉ. सुरेखा भंडारी
द्वितीय – वनिता जोशी
तृतीय – जयश्री नाईक

सॅक रेस – पुरुष :
प्रथम – अरुण तळेबैलकर
द्वितीय – औदुंबर शेट्टे
तृतीय – मनोहर अंकले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × four =

error: Content is protected !!