गणेशोत्सवात भीषण दुर्घटना : घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

गणेशोत्सवात भीषण दुर्घटना : घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव

गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालणारी हृदयद्रावक घटना सोमवारी उशिरा रात्री बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथे घडली. घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील रेफ्रिजरेटरचा स्फोट झाल्याने आग लागली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण घराला वेढा घातल्याने घरातील सदस्यांना बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही. आगीत अडकलेल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत , शारदा दमोने (वय ४५) आणि भारती दमोने (वय ५०) प्रिया दमोने (वय २८) आणि गंगा दमोने (वय २५) यांचा मृत्यू झाला आहे.

तर गजानन दमोने (वय ६५), रोशन दमोने (वय २१) हे गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या दमोने कुटुंबावर गणेश चतुर्थीच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नातेवाईक, शेजारी आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + 18 =

error: Content is protected !!