खानापूर तालुक्यातील तीन मराठी शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

खानापूर तालुक्यातील तीन मराठी शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

खानापूर तालुक्यातील करंबळ, कौंदल आणि रुमेवाडी येथील मराठी प्राथमिक शाळांमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

मराठी भाषा आणि मराठी शाळांचे संवर्धन तसेच विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गेल्या नऊ वर्षांपासून युवा समितीच्या माध्यमातून सीमाभागातील मराठी शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

करंबळ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा समितीचे सदस्य तथा SDMC अध्यक्ष संदेश कोडचवाडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगत मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. यावेळी SDMC कमिटीचे सदस्य आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.

त्यानंतर कौंदल येथील मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी मराठी भाषा व मराठी शाळांचे महत्त्व विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना सांगण्यात आले. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती नागेश भोसले यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होता.

रुमेवाडी शाळेतही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन, पेन्सिल किट तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी जोतिबा घाडी यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होता.

या उपक्रमात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूरचे श्री पाटील, शुभम कांबळे, आदित्य कांबळे, स्वराज पाटील, मुकेश गुरव, साईनाथ मळीक, कृष्णा खांबले, श्रीहरी पाटील, तुषार देसाई, श्रेयस हळ्याळकर, विठ्ठल पाटील आणि ओंकार पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + four =

error: Content is protected !!