गणेशोत्सवानिमित्त ‘आरती संग्रह पुस्तक वाटप’ उपक्रम उत्साहात

गणेशोत्सवानिमित्त ‘आरती संग्रह पुस्तक वाटप’ उपक्रम उत्साहात

बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व धार्मिक बांधिलकी जपत रमेश पावले यांच्या पुढाकाराने ‘आरती संग्रह पुस्तक वाटप’ या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आपली संस्कृती, परंपरा आणि भक्तीभाव घराघरांत पोहोचावा, तसेच गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक घरात आरतीचा मंगलमय नाद घुमावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित भाविक व नागरिकांना आरती संग्रह पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, किरण जाधव, गणेश दड्डीकर, कपिल भोसले, मोतेश बारदेशकर यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

ज्ञान, संस्कार आणि भक्तीची परंपरा पुढे नेणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून, रमेश पावले यांच्या या सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 + 11 =

error: Content is protected !!