श्री गणेश फेस्टिवलच्या सांगता सोहळ्यात नवरत्नांचा सत्कार

श्री गणेश फेस्टिवलच्या सांगता सोहळ्यात नवरत्नांचा सत्कार

बेळगाव : प्रतिनिधी

श्री माता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, श्री भक्ती महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, श्री राजमाता महिला मल्टीपर्पज सोसायटी तसेच ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित **‘श्री गणेश फेस्टिवल बेळगाव’**चा सांगता सोहळा बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नवरत्नांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावर्षी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची नवरत्न म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये समाजसेवकरत्न – श्री अवधूत तुडवेकर, साहित्यरत्न – सौ. शोभा नायक, सामाजिक संस्था – समर्पण यूथ फाऊंडेशन, श्रमसेवारत्न – सौ. आशा पत्रावळी, संगीत रत्न – श्री अशोक परांजपे, क्रीडारत्न – सौ. ललिता गवस, कलारत्न – श्री अजित औरवाडकर, उद्योगरत्न – आयडियल प्रॉडक्ट आणि कृषिरत्न – श्री राजू मर्वे यांचा समावेश आहे.

या नवरत्नांचा सत्कार समारंभ बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्रीमाता सोसायटी सभागृह, न्यू गुड शेड रोड, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्याच्या उद्देशाने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 5 =

error: Content is protected !!