सफाई कर्मचाऱ्यांसमवेत रक्षाबंधन साजरे; सामाजिक बंधुभावाचा दिला संदेश

सफाई कर्मचाऱ्यांसमवेत रक्षाबंधन साजरे; सामाजिक बंधुभावाचा दिला संदेश

बेळगाव : जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्र, बेळगाव आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आजम नगर येथील महादेव मंदिर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.

“रक्षाबंधन हे परस्पर विश्वास, प्रेम आणि सामाजिक बंधुभावाचे प्रतीक आहे,” हा संदेश देत उपस्थितांनी सफाई कर्मचाऱ्यांसमवेत रक्षाबंधन साजरे केले. यावेळी एकमेकांना राखी बांधून परस्पर स्नेह आणि सामाजिक एकात्मतेचा भाव व्यक्त करण्यात आला. तसेच सफाई कर्मचाऱ्यांना प्रार्थनारूपी शुभेच्छा देऊन त्यांच्या समाजसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमात जीवन विद्या मिशनचे ज्येष्ठ प्रबोधनकार सौ. सुवर्णा शंकरराव बांधकर, नामधारक सौ. सुनीता तानाजी पाटील, सौ. वैशाली सुरेश पिसे, सौ. अनुराधा अनिल देसाई, माजी उपमहापौर सौ. रेश्मा पाटील, विश्व हिंदू परिषदेचे श्री. कृष्णाजी भट यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमातून समाजातील विविध घटकांमध्ये स्नेह, विश्वास आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine + 16 =

error: Content is protected !!