बेळगाव : टिळकवाडी १ला गेट गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवाच्या तयारीचा शुभारंभ भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. मंडळाच्या वतीने आयोजित मुहूर्तमेढ पूजन कार्यक्रम माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक आनंद चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.
गणेशोत्सवाच्या तयारीला अधिकृत सुरुवात करताना श्री गणरायाचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी गणपती बाप्पाच्या जयघोषात आगामी उत्सव यशस्वी आणि मंगलमय होण्यासाठी प्रार्थना केली.
भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेला गणेशोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा निर्धार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा हा उत्सव अधिक आकर्षक आणि लोकाभिमुख करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
