बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर सर्वेश रुपेश पाटील याने बेंगळुरू येथे आयोजित खुल्या स्पीड राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत कांस्यपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत राज्यभरातील 500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत सर्वेश पाटील याने उत्कृष्ट स्केटिंगचे प्रदर्शन करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
सर्वेश हा स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे. त्याच्या या यशामागे प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले जात आहे.
सर्वेशला पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव इंदुधर सीताराम तसेच त्याचे आई-वडील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
सर्वेशच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्याचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही तो अशीच उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
