बेळगाव : बेळ्ळारी नाल्याच्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होत असलेले नुकसान आणि त्यावर उपाययोजना यासंदर्भात चर्चा करण्यासाठी वडगाव येथे शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
शेतकरी संघटना आणि बेळ्ळारी नाला विकास समितीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आवाहनानुसार, बुधवार दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता श्री ज्ञानेश्वर मंदिर, राजवाडा कंपाउंड, वडगाव येथे ही बैठक होणार आहे.
या बैठकीत बेळ्ळारी नाल्याच्या पूरामुळे झालेल्या पीक नुकसानीचा आढावा घेण्यात येणार असून, शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करून पुढील लढ्याची दिशा व ठोस निर्णय निश्चित करण्यात येणार आहेत.
वडगाव, जुने बेळगाव, शहापूर आणि अनगोळ परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत एकत्रित भूमिका घेण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचेही सांगण्यात आले आहे.
