बेधडक बेळगावच्या बातमीचा परिणाम; नगरसेवक आनंद चव्हाण यांच्या पाठपुराव्याने मंडोळी रोडवरील धोकादायक ड्रेनेज कव्हर्सची अखेर दुरुस्ती

बेधडक बेळगावच्या बातमीचा परिणाम; नगरसेवक आनंद चव्हाण यांच्या पाठपुराव्याने मंडोळी रोडवरील धोकादायक ड्रेनेज कव्हर्सची अखेर दुरुस्ती

बेळगाव, १८ जुलै : बेधडक बेळगावने मंडोळी रोडवरील खराब व उघड्या पडलेल्या ड्रेनेज कव्हर्समुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला निर्माण झालेला धोका वृत्ताद्वारे प्रकाशझोतात आणल्यानंतर अखेर महापालिकेने या समस्येची दखल घेत संबंधित ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती केली आहे.

या प्रश्नाच्या निराकरणासाठी नगरसेवक आनंद चव्हाण यांनीही महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत महापालिकेच्या सहकार्याने धोकादायक ठरत असलेली ड्रेनेज कव्हर्स दुरुस्त करण्यात आली.

या कामामुळे परिसरातील नागरिक, पादचारी आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून संभाव्य अपघातांचा धोका टळला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना व्हाव्यात यासाठी बेधडक बेळगावने सातत्याने आवाज उठवला असून, या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

नगरसेवक आनंद चव्हाण यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत भविष्यातही अशा समस्या तातडीने सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − 2 =

error: Content is protected !!