ऑल इंडिया ओपन कराटे काता स्पर्धेत बेळगावच्या मानस कराटे अकॅडमीचे घवघवीत यश

ऑल इंडिया ओपन कराटे काता स्पर्धेत बेळगावच्या मानस कराटे अकॅडमीचे घवघवीत यश

बेळगाव : गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया ओपन कराटे काता स्पर्धेत बेळगावच्या मानस कराटे अकॅडमीने उल्लेखनीय कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले. विविध गटांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत अकॅडमीच्या कराटेपटूंनी अनेक पदके पटकावत बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

या यशाचे श्रेय अकॅडमीचे शिहान भरमाणी म. पाटील आणि ज्ञानेश्वर चिक्के यांच्या मार्गदर्शनाला जाते. त्यांच्या प्रशिक्षणाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन केले.

स्पर्धेत बेळगाव शहरासह शिवम गणेशपूर, विजयनगर, बेकिनकेरे तसेच महाराष्ट्रातील कुदनूर आणि नेट्टूर येथील ग्रामीण भागातील अनेक कराटेपटूंनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :

🥇 प्रथम क्रमांक:
साक्षी कांबळे, करण पुजारी, पृथ्वीराज कांबळे, अनिरुद्ध पवार, साई पाटील, आदित्य गुरव, सानवी पाटील आणि सुकन्या कडोलकर.

🥈 द्वितीय क्रमांक:
शेखर पुजारी, अमर मुरचुटे, पृथ्वी घेवडे, प्रांजल जाधव, सानवी पाटील, तन्वी जाधव, श्रेया चौगुले, वेदांती पाटील, श्रेया मिश्रीकोटी, अनिरुद्ध सातेरी, तुषार वाडकर, शिवप्रसाद कौजलगी आणि अस्मी पाटील.

🥉 तृतीय क्रमांक:
आरुष यादव, विराज टवकरी, रिदम गोरे, अपेक्षा घेवडे, साची गांगरकर, प्रीती पाटील, सृष्टी भोगण, अर्पणा इंटुरी, मार्लिंग इंटुरी, आर्यांश गिरी, सर्वेश कुंडेकर, श्रद्धा चौगुले, सचिन नंदी, साई श्री निकम, मृणाली घुमटे आणि मशनू पाटील.

स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सर्व कराटेपटूंचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या या यशामुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − nineteen =

error: Content is protected !!