बेळगाव : जय शंभूराजे परिवार, बेळगाव विभागाच्या वतीने खानापूर तालुक्यातील विविध मराठी माध्यमाच्या सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत एकूण ६० विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, पट्टी आदी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शैक्षणिक साहित्याचे वितरण पुढील शाळांमध्ये करण्यात आले :
- सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, कुसमळी – १० विद्यार्थी
- सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, जांबोटी – ६ विद्यार्थी
- सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, उचवडे – ७ विद्यार्थी
- सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, बैलूर – १६ विद्यार्थी
- सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, कौलापूर – ८ विद्यार्थी
- सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, हबनहट्टी – १३ विद्यार्थी
अशाप्रकारे एकूण ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
जय शंभूराजे परिवाराच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी स्वागत करत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
