मुक्तांगण विद्यालयात बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

मुक्तांगण विद्यालयात बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

बेळगाव : आदर्श गुण विकास प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालय, भाग्यनगर येथे बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कैवल्य योग आश्रमचे योगगुरू विश्वनाथ मनगुतकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व प्रात्यक्षिकांसह समजावून सांगत नियमित योगाभ्यासाचे फायदे पटवून दिले.

कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन ए. एल. गुरव तसेच संचालक एस. एल. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना व स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सुप्रिया टोणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर विद्यालयाच्या प्राचार्या सविता जे. के. यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.

यावेळी विद्यार्थी ओमकार नेतलकर याने विविध योगासने सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. सुश्मिता टोणपे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवंतिका मंजलकरखुशी माडकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पी.ई. शिक्षक अर्जुन भेकणे यांनी केले.

योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, असा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 3 =

error: Content is protected !!