बेळगुंदी : विश्व भारत सेवा संचलित व्ही.बी.एस.एस. गर्ल्स हायस्कूल, बेळगुंदी येथे जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने विद्यार्थिनींना शालेय गणवेश वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही.बी.एस.एस. संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी होते. प्रमुख अतिथी म्हणून जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगावचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण शिंदे, संजय पाटील, शिवराज पाटील (माजी अध्यक्ष), मधु बेळगावकर, अरुण काळे (उपाध्यक्ष), दिलीप सोहनी, मुकुंद महागावकर, वाय. एन. पाटील, राहुल बेलवलकर, ईश्वर पाटील, दुर्गेश हरिते, श्रीशैल मालशेट्टी तसेच संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या २५ विद्यार्थिनींना दिलीप सोहनी यांच्या वतीने शाळेचे गणवेश वितरित करण्यात आले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना ॲड. लक्ष्मण शिंदे यांनी जायन्ट्स ग्रुपच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात विजयराव नंदीहळ्ळी यांनी जायन्ट्स ग्रुपच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एम. वाय. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन के. डी. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विद्या फाळके यांनी केले. कार्यक्रमास शाळेचे सर्व कर्मचारी, विद्यार्थिनी तसेच मान्यवर उपस्थित होते.
