हेल्मेट नसल्यास पेट्रोल नाही; बेळगावात विशेष मोहीम

हेल्मेट नसल्यास पेट्रोल नाही; बेळगावात विशेष मोहीम

बेळगाव, दि. 12 जून : रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यू आणि गंभीर दुखापती कमी करण्याच्या उद्देशाने बेळगाव शहर पोलिसांनी “No Helmet – No Fuel” ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम 15 जून ते 21 जून 2026 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या दहा वर्षांत बेळगाव शहर वाहतूक क्षेत्रात घडलेल्या रस्ते अपघातांमध्ये 358 जणांचा मृत्यू झाला असून 1,492 जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

मोहीमेअंतर्गत 19 जून 2026 रोजी शहरातील पेट्रोल पंपांवर “No Helmet – No Fuel” नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले नसल्यास त्यांना इंधन देऊ नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने पेट्रोल पंप चालकांना केले आहे.

पोलिस आयुक्तांनी नागरिकांना स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे तसेच दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर अनिवार्यपणे करण्याचे आवाहन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + six =

error: Content is protected !!