बेळगाव, दि. १० : उद्योजकांना एकत्र आणून व्यवसाय वृद्धीसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने **‘सॅटरडे क्लब बेळगाव चॅप्टर’**चा भव्य शुभारंभ गुरुवार, ११ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ट्रीहाऊस कॅम्बर्स हॉटेल, सोमवार पेठ, बेळगाव येथे होणार आहे.
या कार्यक्रमामध्ये आधुनिक व्यवसाय धोरणे, प्रभावी नेटवर्किंग, नवीन ग्राहक आणि व्यावसायिक संधी, तसेच उद्योजकांमध्ये थेट संपर्क वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. सहभागी उद्योजकांना स्वतःच्या व्यवसायाचे सादरीकरण करण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या शुभारंभ सोहळ्याला श्री. सुहास फडणीस आणि श्री. महेश इनामदार यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, व्यवसाय क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी बिझनेस फॉर्मल्स किंवा ब्लेझर असा ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. मराठी उद्योजकांनी एकत्र येऊन परस्पर सहकार्य आणि नेटवर्किंगद्वारे व्यवसाय विस्तारासाठी ही सुवर्णसंधी असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
“आजचा एक संपर्क उद्याचा मोठा व्यवसाय ठरू शकतो,” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम बेळगावच्या उद्योजकीय विश्वाला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
